स्पर्श स्थलांतरित पेन्शन | Sparsh Migrant pension

 स्पर्श स्थलांतरित पेन्शनर |

Sparsh Migrant पेन्शनर

स्पर्श स्थलांतरित पेन्शन |  Sparsh Migrant pension



स्पर्श स्थलांतरित पेन्शन |  Sparsh Migrant pension



एसबीआय संदेश : एस.बी.आय. ने जुन्या सर्व पेंशनर्स (म्हणजे ले लोक  जानेवारी 2005 से डिसेंबर 2015 या कालावधित  रिटायर झाले आहेत) त्या सर्वाना पेंशन हस्तांतरण विषयी  एक संदेश (एसएमएस) पाठविला आहे, जो खालिलप्रमाणे आहे.

"प्रिय ग्राहक, PCDA च्या निर्देशानुसार, तुमची पेन्शन SBI मधून SPARSH (PCDA पेन्शन) मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे"

आता ज्यांना ज्यांना हा संदेश आज मिळाला आहे , ते थोडे परेशान झाले आहेत.  परेशान यासाठी झालेत की, आता पुढील  कार्यवाही काय व कशी करायची आहे ?
माझी तुम्हाला सलाह अशी आहे की, टेंशन घेण्यासारखा विषय नाही आहे.आता तुम्ही  PCDA(P) पीसीडीए च्या  संदेश ची  प्रतीक्षा करा.  जर एक आठवडा किंवा या 10 दिवसाच्या आत पीसीडीए कडून खालिलप्रमाणे मैसेज येईल.

2 आठवड्यात लगेचच  तुम्हाला PCDA प्रयागराज कडून स्पर्श Login ID व password येईल. कृपाकरुन मैसेज किंवा मेल वर लक्ष ठेवा व मैसेज मध्ये सांगितल्याप्रमाणे कारवाई करा.अन्यथा तुमची पेंशन बंद होईल.
👇

Dear ....................,Your account has been created. Your Pensioner ID is 227201600275.To login and avail the services provided by SPARSH use either of the following options:
1. Visit: sparsh.defencepension.gov.in
2. Visit nearest Pension Service Center Your SPARSH Account Credentials are:
Username:22720160027501 Password:Bt4R521ZYZ

For assistance, contact your RO/SHQ or Call 18001805325 between 9:30 AM-6:00 PM (Mon-Fri) PCDA (Pensions)

वरील मेसेज ज्यांना आला आहे त्यांचे Account SPARSH मध्ये transfer झाले आहे म्हणजे या पूर्वी पेन्शन CPPC मार्फत संबंधित बँक खात्यात क्रेडिट होत होती आता असे न होता डायरेक्ट PCDA (Pension) Allahabad कडून आपल्या बँक खात्यात credit होईल.

मेसेज मध्ये  User ID आणि Pass Word येईल. तो User ID म्हणजेच SPARSH चा PPO No किंवा आपला नवीन PPO No राहील. User ID आणि Pass Word आल्या नंतर त्याच्या साहयाने SPARSH च्या website वर जाऊन आपण आपले details बघू शकतो. त्यानंतर Manage Profile मध्ये जाऊन आपले profile update करावे लागेल, त्यात
तुमचा  आणि पत्नीचा Aadhar No, PAN No update करणे तसेच इतर डिटेल्सची तपासणी करून submit करावे लागेल. सर्व डिटेल्स Submit केल्या नंतर ते Record Office verify करील त्यानंतर आपला आधार नंबर SPARSH PPO शी लिंक होऊन आपल्याला नवीन PPO बनल्याचा मेसेज येईल. त्यानंतर नवीन PPO download करून त्याची प्रिंट घेणे आणि नंतर पुन्हा SPARSH मध्ये Life Certificate upload करावे लागेल. त्यासाठी मुदत दिली जाईल.

🌹🌹🌹
  किंवा काही मैसेज/ संदेश तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही पीसीडीए च्या वेबसाइट वर तुमचा

स्पर्श स्थलांतर स्थिती SPARSH MIGRATION डेटा

तपासा.  तपास करण्यासाठी ची पध्दत खालिलप्रमाणे  आहे -
👇

गुगल क्रोम..उघडा pcdapension.nic.in
पीसीडीए चे  होम पेज ओपन झाल्यानंतर , स्क्रोल डाऊन मध्ये जिथे
स्पर्श मध्ये स्थलांतर (migration in to sparsh) पर्याय मिळतो, ठीक त्याच्या खाली  स्थिती तपासा (Check Status) वर क्लिक करा.
आता  एक नविन पान उघडेल -
तुमचा स्पर्श पीपीओ आणि ओळख स्थिती जाणून घ्या
जिथे  स्पर्श पीपीओ नंबर लिहीले आहे , त्यावर क्लिक करा.  आता एक पॉप-अप उघडेल, जिथे 4 पर्याय आसतील, जसे:-
* स्पर्श पीपीओ क्र
* ई-पीपीओ क्र
* IC क्रमांक/रेजिमेंटल क्रमांक/GPF क्रमांक.
* बँक खाते क्र.

आता तुम्ही  रेजिमेंटल नंबर वर क्लिक करा आणि ज्या  बॉक्स मध्ये  ऑप्शन व्हॅल्यू (option value) वर तुमचा सर्विस नंबर  टाइप करा.   नंतर  इमेज व्हेरिफिकेशन  करा आणि परत  सबमिट करुन क्लिक करा.
जेंव्हा तुम्ही  सबमिट वर क्लिक कराल , लगेचच  एक आणखी पेज उघडेल ज्यावर तुमचा  पर्सनल डेटा असेल जसा की तुमचा .....
मूळ पीपीओ क्रमांक
इ पीपीओ क्रमांक
नाव
बँक अकाउंट क्रमांक
स्पर्श पीपीओ नंबर
आयसी/रेजिमेंटल/जीपीएफ क्र.
बँक खाते क्र.
सर्व डिटेल आलेली असेल त्या पानाचा एक स्क्रीनशॉट काढुन ठेवा.  आणि स्पर्श पीपीओ नं..सुध्दा डायरी मध्ये  आवश्य नोट करुन ठेवा.  कारण की, आता तुम्ही स्पर्श स्थलांतरित पेंशनर बनला आहात.  आणि, हा तुमचा नविन पीपीओ आहे.  आणि हाच  पीपीओ नंबर तुम्हांला प्रत्येक जागी जरुरत पडेत राहील, 
मग ते लाइफ सर्टिफिकेट जमा करायचे असु दे किंवा , कोणता पत्रव्यवहार करायचा असेल किंवा  कोणत्याही प्रकारची तक्रार करायची असेल .  प्रत्येक ठिकाणी हा स्पर्श पीपीओ नंबर टाकावा लागेल.

अत्यंत महत्त्वाचे :

तुमचे लाईफ सर्टिफिकेट स्पर्श ला देण्याचे विसरु नका. 🌹

हे अगदी जीवन प्रमाण सारखे आहे, येथे बँकेऐवजी तुम्हाला स्पर्श आणि नवीन स्पर्श पीपीओ क्रमांक निवडणे आवश्यक आहे.  ईतर प्रक्रिया तशीच राहते.

https://youtu.be/xfltvasw5pq



धन्यवाद,
नमस्कार, जय हिंद..!
🙏🇮🇳

( श्री.सुभाष डोंगरे,सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,ठाणे/पालघर द्वारा सैनिक कल्याणार्थ )
  
स्पर्श स्थलांतरित पेन्शन | Sparsh Migrant पेन्शन

 मी "पेन्शन सेल इलाहाबाद" "स्पर्श" येथील टोल फ्री क्रमांक ला  कॉल केला, व माझी बातचीत झाली आणि ज्यांना ज्यांना स्पर्श चा मेसेज आलेला नाही,त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की,काही काळजी करायची गरज नाही, सर्व हळूहळू मायग्रेड होत आहेत. कृपया तरी सर्वांनी नोंद घ्यावी..


Comments

Post a Comment